मुलीच्या फोनवरून वाठारमध्ये तोडफोड
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:41:34+5:302014-10-05T00:48:10+5:30
चारजणांच्या विरोधात गुन्हा नोंद

मुलीच्या फोनवरून वाठारमध्ये तोडफोड
पेठवडगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथील साखरवाडीमध्ये फिर्यादीची मुलगी फोन करते या कारणावरून घराची व प्रापंचित साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी चारजणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
सर्जेराव शामराव दबडे (वय ४५), अर्जुन सर्जेराव दबडे (१६), कैलास ऊर्फ सूरज सर्जेराव दबडे व अज्ञात एकजणाविरोधात वडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची मुलगी ही अर्जुन दबडे यास फोन करते. यावरून सर्जेराव दबडे व त्यांची दोन मुले, एक अज्ञात यांनी मुलीच्या घरावर हल्ला केला. यामध्ये घरातील प्रापंचिक साहित्य व टीव्हीची मोडतोड केली.