बावड्यात विहिरीत बुडणाऱ्याला जवानाने वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:46+5:302021-09-11T04:25:46+5:30

कसबा बावडा : येथील रेणुका मंदिर शेजारीच कृषी विभागाच्या विहिरीमध्ये बुडणाऱ्या सचिन महादेव मोरे (वय ५०, रा. डबरा ...

Troopers rescued the drowning man in Bavda | बावड्यात विहिरीत बुडणाऱ्याला जवानाने वाचवले

बावड्यात विहिरीत बुडणाऱ्याला जवानाने वाचवले

कसबा बावडा : येथील रेणुका मंदिर शेजारीच कृषी विभागाच्या विहिरीमध्ये बुडणाऱ्या सचिन महादेव मोरे (वय ५०, रा. डबरा कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा) या व्यक्तीस अग्निशामन दलाचे जवान संभाजी ढेपले यांनी मोठ्या धाडसाने पाण्यात उडी घेऊन वाचवले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

अग्निशमन दलाचे जवान रफिक शेख हे ड्युटीवर हजर होण्यासाठी फायर स्टेशनकडे निघाले होते. यावेळी त्यांना रस्त्याकडेला असणाऱ्या कृषी विभागाच्या विहिरीच्या कठड्यावर सचिन मोरे हे संशयास्पदरित्या बसल्याचे आढळले. ते उतरून त्याच्याकडे चौकशीसाठी जाण्यापूर्वीच मोरे यांनी विहिरीमध्ये उडी घेतली. रफिक शेख यांनी याबाबतची लगेचच कसबा बावडा अग्निशमन दलाला याची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे जवान संभाजी ढेपले यांनी घटनास्थळी येत विहिरीमध्ये उडी मारून सचिन मोरेला पाण्याबाहेर काढले.

Web Title: Troopers rescued the drowning man in Bavda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.