नीना गुप्ता शॉर्टस‌्मुळे झाल्या ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:13+5:302021-06-27T04:17:13+5:30

------------- शेफाली जरीवालाचा संतप्त सवाल ‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाने २००४ मध्ये हरमित ...

Trolls caused by Nina Gupta shorts | नीना गुप्ता शॉर्टस‌्मुळे झाल्या ट्रोल

नीना गुप्ता शॉर्टस‌्मुळे झाल्या ट्रोल

-------------

शेफाली जरीवालाचा संतप्त सवाल

‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाने २००४ मध्ये हरमित सिंहशी, २०१४ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले; पण लग्नानंतर शेफाली मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. एक महिलेने दुसऱ्यांदा लग्न केल्यावर कसे पाहिले जाते, या प्रश्नाला उत्तर देताना शेफाली संतप्त झाली. ती म्हणाली, ‘पुरुषांनी १० वेळा लग्न केले तरी चालते; पण एका महिलेने दुसऱ्यांदा केलेले लग्न चालत नाही?’

-------------------------------

पायल रोहतगीच्या अटकेवर संग्राम सिंग संतप्त

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा जोडीदार आणि कुस्तीपटू संग्राम सिंग संतापला आहे. पायल रोहतगीच्या अटकेची बातमी समजताच संग्राम सिंग मुंबईहून अहमदाबादला पोहोचला आणि आता तो म्हणतो की, सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना आधीच पैसे दिले होते. पायलला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. पायलवर सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

-------------------------------------------

मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

पश्चिम बंगालमधील टीएमसी खासदार ॲक्ट्रेस मिमी चक्रवर्ती गंभीर आजारी पडल्या आहेत. त्यांनी नुकताच बनावट लसीकरण केंद्रावरून लसीचा पहिला डोस घेतला होता. यापूर्वी, मिमी यांनी ट्विट करीत, लस घेतल्याने आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, असे म्हटले होते. मात्र, लस घेतल्यानंतर चार दिवसांनी त्या आजारी पडल्या आहेत.

(संदीप आडनाईक)

===Photopath===

260621\26kol_11_26062021_5.jpg~260621\26kol_12_26062021_5.jpg

===Caption===

पायल रोहतगी~ मिमी चक्रवर्तीं

Web Title: Trolls caused by Nina Gupta shorts