शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या तृप्तीने खेलो इंडियात पटकाविले ब्राँझपदक, जिल्ह्यात एकूण चार पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 16:43 IST

तृप्ती आणूर गावात पहिलीच महिला कुस्ती पट्टू

दत्ता पाटील म्हाकवे : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत कोल्हापूरच्या तृप्ती आप्पासो गुरव हिने ब्राँझपदक पटकाविले. आणूर (ता.कागल) येथील तृप्तीने ४६ किलो वजन गटात हे पदक पटकाविले. दिल्ली, हरयाणा, सांगली येथील मल्लांशी तिच्या लढती झाल्या. आणूर गावात पहिलीच महिला कुस्ती पट्टू बनलेल्या तृप्ती हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.ती सध्या गोखले महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकत आहे. तिने दोन वेळा शालेय स्पर्धेत राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. तिला वस्ताद शिवाजीराव जमनिक (बानगे) व कुस्तीकोच संदीप पाटील दोनवडे (ता.करवीर) यांचे मार्गदर्शन लाभले.भुदरगडमधील ऋषिप्रसादला दोन रौप्य तर सानियाला कांस्यपदकभोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील दोन भूमिपुत्रांनी रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली आहे. खेडगे (ता.भुदरगड) येथील ऋषीप्रसाद संजय देसाई यांनी रीले आणि धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकावले. त्याने धावण्याच्या स्पर्धेत १०.६७ सेकंदात शंभर मीटर अंतर पार करून रौप्य पदक पटकावले. तर १०० × ४ या रिले प्रकारात देखील रौप्य पदक पटकावले.

तर, रायफल नेमबाजी स्पर्धेमध्ये गारगोटी येथील सानिया सुदेश सापळे हिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. सानिया हिने खेलो इंडियामधील हे पहिलेच पदक मिळवले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKhelo Indiaखेलो इंडियाWrestlingकुस्ती