बहिरेश्वर येथे शहीद जवानांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:41+5:302020-12-05T04:53:41+5:30
सावरवाडी : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील गावातील तरुण मंडळांतर्फे शहीद जवानांना सामुदायिक कँडल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली. गावातील ...

बहिरेश्वर येथे शहीद जवानांना आदरांजली
सावरवाडी : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील गावातील तरुण मंडळांतर्फे शहीद जवानांना सामुदायिक कँडल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली. गावातील माजी सैनिक, आजी सैनिक, तरुणांनी गावातून मेणबत्ती मोर्चा काढत मेणबत्तीच्या प्रकाशात आदरांजली वाहिली. यावेळी तीनशेहून अधिक युवक सहभागी झाले होते. मुख्य चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.