गडमुडशिंगीत तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:07+5:302021-01-08T05:17:07+5:30
गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा तिरंगी सामना रंगला आहे. या निवडणुकीत गावात सत्ताधारी ...

गडमुडशिंगीत तिरंगी लढत
गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा तिरंगी सामना रंगला आहे. या निवडणुकीत गावात सत्ताधारी पुन्हा सत्ता आणणार की विरोधक सत्तांतर घडविणार याकडे लक्ष लागले आहे. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांसाठी एकूण ४८ उमेदवार आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये सहा विद्यमान सदस्य असून सहा अपक्षांनी दंड थोपटले आहेत. गडमुडशिंगीत सतेज पाटील ग्रामविकास आघाडी, सत्ताधारी कै. शिवाजी कृष्णात पाटील शेतकरी विकास पॅनल आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत असून, सत्ताधारी व विरोधी गटांकडून सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत; तर बहुजन विकास आघाडी आठ जागा लढवीत आहे. गावातील तीनही आघाड्यांकडून प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. पदयात्रा, रॅलीवर तिन्ही आघाड्यांनी भर दिला आहे.