मंगेश्वर ग्रुपचे वृक्षसंवर्धनाचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:30+5:302021-07-14T04:27:30+5:30
उचगावात झाडांचा वाढदिवस साजरा उचगाव : पर्यावरणाचे रक्षण व्हावे, वृक्षसंगोपनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी गेली १३ वर्षे श्री ...

मंगेश्वर ग्रुपचे वृक्षसंवर्धनाचे कार्य उल्लेखनीय
उचगावात झाडांचा वाढदिवस साजरा
उचगाव : पर्यावरणाचे रक्षण व्हावे, वृक्षसंगोपनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी गेली १३ वर्षे श्री मंगेश्वर ग्रुपचे सदस्य झाडांचा वाढदिवस उत्साहाने आणि आपुलकीने साजरा करतात. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
उचगाव ता करवीर येथील श्री मंगेश्वर ग्रुपच्यावतीने झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच मधुकर चव्हाण होते. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळामध्ये निसर्गामध्ये मोफत उपलब्ध ‘ऑक्सिजन’ची खऱ्या अर्थाने किंमत कळली आहे. कोल्हापुरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या झाडांचे संवर्धन करण्यावर माझा भर आहे. यावेळी कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मालूताई गणेश काळे, माजी सरपंच गणेश काळे, कावजी कदम, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, दीपक भांडवलकर, अशोक निगडे उपस्थित होते.
फोटो :१२ उचगाव ट्री बर्थडे
उचगाव येथील श्री मंगेश्वर ग्रुपच्या वतीने झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आमदार ऋतुराज पाटील, माजी सरपंच मधुकर चव्हाण, सरपंच मालूताई काळे, सपोनि दीपक भांडवलकर उपस्थित होते.