शिंगणापूर मार्गावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST2021-07-23T04:15:59+5:302021-07-23T04:15:59+5:30

कोल्हापूर : फुलेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विजय तायशेटे व मित्र परिवाराच्या वतीने शिंगणापूर रोडच्या दोन्हीही बाजूचा परिसर कचरामुक्त करून ...

Tree planting on Shinganapur road | शिंगणापूर मार्गावर वृक्षारोपण

शिंगणापूर मार्गावर वृक्षारोपण

कोल्हापूर : फुलेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विजय तायशेटे व मित्र परिवाराच्या वतीने शिंगणापूर रोडच्या दोन्हीही बाजूचा परिसर कचरामुक्त करून तेथे वृक्षारोपण करण्यात आले.

शिंगणापूर फाटा ते मातोश्री वृद्धाश्रम या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. विजय तायशेटे यांच्या पुढाकाराने अनेकवेळा हा कचरा हटविण्यात आला. बुधवारी पुन्हा जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या दोन्हीही बाजूचा कचरा उचलण्यात येऊन परिसर कचरामुक्त केला. गुरुवारी सकाळी या मार्गावर पहिल्या टप्प्यातील देशी रोपांचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविला. मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.

यावेळी अजित पवार, अमर पाटील, संतोष मोरे, लक्ष्मण जानकर, मयूर कांदळकर, राहुल देसाई, मोहन कांबळे, आशिष सांगावकर, विनायक पेंडूरकर, पवन तायशेटे, खन्दु संकपाळ, वैभव कवडे, बाळू पाटील यांनी सहकार्य केले.

फोटो नं. २२०७२०२१-कोल-शिंगणापूर

ओळ : शिंगणापूर रस्त्यावर मातोश्री वृद्धाश्रमनजीक विजय तायशेटे व मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

220721\22kol_5_22072021_5.jpg

ओळ : शिंगणापूर रस्त्यावर मातोश्री वृध्दाश्रम नजीक विजय तायशेटे व मित्र परिवाराच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Tree planting on Shinganapur road