शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

By admin | Updated: January 12, 2017 01:10 IST

इतरांसाठी अनुकरणीय : प्रकल्पासाठी बाहेरुन आणला जातो दररोज दीड टन कचरा

कागल : रोज तयार होणारा कचरा साठवायचा कोठे? तो गोळा कसा करायचा? त्याची निर्गत कोठे आणि कशी करायची, याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत आहेत. कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे. वीजनिर्मीतीसाठी कागलला प्रत्येक्षात कचऱ्याचीच टंचाई भासू लागल्याने त्यांनी कागलबाहेरुन महामार्गावरील हॉटेल, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदी ठिकाणाहून कचरा उपलब्ध केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. कागल नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी देशभरातून अधिकारी, प्रतिनिधी भेट देत आहेत.२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.हा वीजनिर्मिती प्रकल्प प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून होता. या प्रकल्पापूर्वीही गांडूळ खत, कचरा उठाव, घंटागाडी यासारखे उपक्रम राबविले होते. यामुळे मंत्रालयीन पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागलला देण्याबद्दल आमदार मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी १०० टक्के अनुदान म्हणून साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती असे या प्रकल्पाचे सूत्र आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते. तसेच जो कुजणारा कचरा नाही, पण विद्युत विघटन होते, तो कचरा नष्ट केला जातो. तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या काही वस्तू घटकावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करण्यासाठी कागल परिसरातील १५ ते २० भंगार गोळा करणारे येथे येतात. त्यांना नगरपालिकेने काही सुविधा दिल्या आहेत. अशा पद्धतीने १०० टक्के कचऱ्याची निर्गत किंवा विल्हेवाट येथे लावली जाते. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर केवळ कागलमध्ये आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत देशात हा एकमेव प्रकल्प आहे. (प्रतिनिधी)वीज प्रकल्पासाठी कागलबाहेरील हायवेलगतची हॉटेल्स, बाजारपेठा, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथूनही सरासरी एक ते दीड टन ओला कचरा आणला जातो.आरोग्य विभागाकडे ८० कर्मचारी, नऊ वाहनेओला-सुका कचरा भरून ठेवण्यासाठी सात हजार घरांना १४ हजार बकेट पुरवठामात्र, अजून नागरिकांच्यात जनजागृतीची गरज; कचरा एकत्रच भरला जातो आणि बकेटचा इतर कामांसाठी वापर होत आहे.