परिवहन कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:49+5:302020-12-13T04:38:49+5:30
निपाणी : कर्नाटक राज्यातील सरकारी बसच्या चालक-वाहक व अन्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला निपाणी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत ...

परिवहन कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय
निपाणी : कर्नाटक राज्यातील सरकारी बसच्या चालक-वाहक व अन्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला निपाणी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला. यामुळे निपाणी बसस्थानकावर शनिवारी शुकशुकाट पसरला होता, तर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. या संपामुळे निपाणी आगाराचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.
सध्या खासगी तत्त्वावर सेवेत असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावे, यासाठी कर्नाटकातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद संप पुकारला होता. याला निपाणी आगाराने पाठिंबा देत ३६४ कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. यामुळे सर्व बस फेऱ्या बंद होत्या. निपाणी आगारातून रोज शेकडो बस फेऱ्या होत असतात. महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी बस फेऱ्या निपाणी आगारातून होत असल्याने आगारचे उत्पन्न चांगले आहे.
या संपात वाहक, चालक व मेकॅनिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपामुळे निपाणीतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
फोटो
निपाणी : बससेवा बंद असल्याने आगारात बस थांबून होत्या.