वाहतूक विभागाने महालक्ष्मीकरण थांबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST2021-02-25T04:31:12+5:302021-02-25T04:31:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे महालक्ष्मीकरण करण्याचा डाव सामाजिक संघटनांनी उधळून लावला आहे. मात्र आता वाहतूक ...

वाहतूक विभागाने महालक्ष्मीकरण थांबवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे महालक्ष्मीकरण करण्याचा डाव सामाजिक संघटनांनी उधळून लावला आहे. मात्र आता वाहतूक शाखा फलकांच्या माध्यमातून असा प्रयत्न करत आहे की काय, अशी विचारणा करत बुधवारी संभाजी ब्रिगेड फलकांवर अंबाबाई मंदिर असे लिहावे, अशी मागणी केली. अन्यथा बहुजनांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्याशी यावर दूरध्वनीवरून चर्चा केली. काही वर्षांपूर्वी अंबाबाईचे महालक्ष्मीकरण करण्याचा डाव काही जणांनी आखला होता, तो सामाजिक संघटनांनी उधळून लावला. त्यावेळच्या आंदोलनानंतर शहरातील सर्व फलकांवर अंबाबाई मंदिराकडे, असे लिहिण्यात आले. पण आता परत कोल्हापूर वाहतूक शाखेने विविध चौकात महालक्ष्मी मंदिराकडे, असे फलक लावले आहेत. तरी हे फलक हटवून त्याठिकाणी अंबाबाई मंदिराकडे असे लिहिलेले फलक लावण्यात यावेत, अन्यथा शाखेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
---
फोटो नं २४०२०२१-कोल-संभाजी ब्रिगेड
ओळ :
कोल्हापुरातील वाहतूक शाखेतर्फे मिरजकर तिकटी, बिंदू चौकासह शहरात ठिकठिकाणी महालक्ष्मी मंदिराकडे, असे फलक लावण्यात आले आहेत.
----