शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:22 IST

police, transcfer, kolhapurnews खात्यांतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली इतर परिक्षेत्रांत करण्यात आली होती, पण त्यांच्या वयोमानानुसार सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याचा महत्त्वपूर्व निर्णय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देपदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच!सहानुभूतीपूर्वक विचारांती निर्णय; इतर परिक्षेत्रांत झालेल्या बदल्या रद्द

कोल्हापूर : खात्यांतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली इतर परिक्षेत्रांत करण्यात आली होती, पण त्यांच्या वयोमानानुसार सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची बदलीकोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याचा महत्त्वपूर्व निर्णय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घेतला आहे.राज्यातील पोलीस खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील ३९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती. या पदोन्नतीबरोबरच त्यांच्या कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी बदल्या करण्यात आल्या होत्या.

पदोन्नती मिळालेल्यांपैकी बहुतेकजण सेवानिवृत्तीच्या जवळपास पोहोचले आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळूनही बदलीमुळे कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर जावे लागणार असल्याने ते पोलीस अधिकारी आनंदाऐवजी नाराज झाले होते. त्यापैकी काहींनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याची विनंती केली होती, त्यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परीक्षेत्रातच करण्याचा निर्णय लोहिया यांनी घेतला. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या नूतन पोलीस निरीक्षकांना आपल्या परिक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीkolhapurकोल्हापूर