सीपीआरकडील ३३ डॉक्टरांच्या सिंधुदुर्गला बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST2021-05-18T04:26:16+5:302021-05-18T04:26:16+5:30

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील ३३ डॉक्टर्स, प्राध्यापक, ...

Transfer of 33 doctors from CPR to Sindhudurg | सीपीआरकडील ३३ डॉक्टरांच्या सिंधुदुर्गला बदल्या

सीपीआरकडील ३३ डॉक्टरांच्या सिंधुदुर्गला बदल्या

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील ३३ डॉक्टर्स, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या बदल्या सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या बदल्या झाल्या असल्या तरी हे सर्वजण कोरोना काळात कोल्हापुरातच काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी मान्यता दिली होती, तर जानेवारी २०२१ मध्ये ५२४ पदांनाही मान्यता दिली होती. यासाठी जी परीक्षण समिती येणार आहे त्याआधी आवश्यक प्राध्यापकांच्या जागा भरणे आवश्यक असल्याने कोल्हापूरहून या सर्वांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदल्या झाल्या असल्या तरी कोरोना संपेपर्यंत हे सर्वजण कोल्हापूरमध्येच कार्यरत राहणार आहेत. या बदल्यांच्या आदेशामुळे सिंधुदुर्गच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रारंभाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाल्याचे मानले जाते.

कोट

कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहप्राध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या झाल्या असून कोरोनाच्या काळात हे सर्वजण सीपीआरमध्येच कार्यरत राहणार आहेत.

डॉ. एस. एस. मोरे

अधिष्ठाता राजर्षी शाहू छत्रपती महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

Web Title: Transfer of 33 doctors from CPR to Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.