तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST2021-07-28T04:26:10+5:302021-07-28T04:26:10+5:30

गेले पाच दिवस पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे बंद असलेला गांधीनगर, तनवानी कॉर्नर ते तावडे हॉटेल कोल्हापूर हा रस्ता ...

Traffic under Tawde Hotel Highway flyover resumed | तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील वाहतूक सुरु

तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील वाहतूक सुरु

गेले पाच दिवस पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे बंद असलेला गांधीनगर, तनवानी कॉर्नर ते तावडे हॉटेल कोल्हापूर हा रस्ता दुपारी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. पुणे बेंगलोर महामार्ग चालू झाल्यानंतर तनवानी कॉर्नर तावडे हॉटेल येथील महामार्ग उड्डाणपुलाखालील रस्त्यावर पाणी असल्याने ही वाहतूक उचगावमार्गे वळविण्यात आली होती. मात्र मंगळवारी उचगाव येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील पाणी कमी झाल्याने गांधीनगर पोलिसांनी दुपारी तावडे हॉटेलमार्गे वाहतूक सुरु केली. वाहतूक सुरळीत चालू असल्याचे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. गेले पाच दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. आता वाहतूक सुरळीत चालू झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

२७ गांधीनगर

फोटो ओळी : तावडे हॉटेल उड्डाणपुलाखालून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली. (छाया : बाबासाहेब नेर्ले)

Web Title: Traffic under Tawde Hotel Highway flyover resumed