सांगली - कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:24 IST2021-07-28T04:24:03+5:302021-07-28T04:24:03+5:30

दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने प्रात्यक्षिक घेण्यात आले तद्नंतर महामार्गावर थांबून असलेले मोठमोठे ट्रक, डंपर ,ऑइल टँकर यांची संख्या जास्त असल्याने ...

Traffic on Sangli-Kolhapur state highway resumes | सांगली - कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू

सांगली - कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू

दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने प्रात्यक्षिक घेण्यात आले तद्नंतर महामार्गावर थांबून असलेले मोठमोठे ट्रक, डंपर ,ऑइल टँकर यांची संख्या जास्त असल्याने वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती. दुपारी बारा नंतर सर्व वाहनांना वाहतूक खुली झाली आहे. सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पथक उपस्थित आहे.

* महामार्गावर भेगा

गेले चार दिवस पाण्याला असलेल्या वेगामुळे रिलायन्स पंप नजीकच्या भागात रस्त्याला भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसून येत आहे.

फोटो ओळ- उदगाव ता. शिरोळ येथील रेल्वे ब्रीज नजीक पाण्याची पातळी कमी झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुरू झाली.

Web Title: Traffic on Sangli-Kolhapur state highway resumes