चक्क महामार्गावरच उलट दिशेने वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:28+5:302021-03-18T04:22:28+5:30
कणेरी : गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडी परिसरात पुणे-बंगलोर महामार्गावर अवजड वाहनेच उलट दिशेने प्रवास करीत असल्याचे चित्र असून, ...

चक्क महामार्गावरच उलट दिशेने वाहतूक
कणेरी : गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडी परिसरात पुणे-बंगलोर महामार्गावर अवजड वाहनेच उलट दिशेने प्रवास करीत असल्याचे चित्र असून, हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर महामार्ग पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. गोकुळशिरगाव ते उजळाईवाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून चारचाकी व दुचाकी वाहने थेट सेवा मार्गावरून न जाता उलट दिशेने येतात. त्यामुळे महामार्गावर सरळ दिशेने जाणारा वाहनधारक गोंधळून जातो व वाहन महामार्गावरून खाली सेवामार्गावर घेतो. सायंकाळी तर, मोठी अवजड वाहने उलट दिशेनेच येत असतात. अशावेळी समोरील वाहनधारक गोंधळून जात आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी अशा वाहनांवर नजर ठेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.