गौरव सांगावकरराधानगरी : दाजीपूर- राधानगरी रस्ता दुरुस्ती व नूतनिकरणाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. गेली ४५ दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद होता. दाजीपूर परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दोन वेळा हा रस्ता खराब झाला होता. आता पुन्हा नव्याने राधानगरी तहसील कार्यालय ते दाजीपूर पर्यंत डांबरीकरण सीलकोट मारून रस्ता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. फेजीवडे येथील पुलाचे काम ही पूर्ण झाले असून या मार्गांवरून दिवसा व रात्री सर्व प्रकारची वाहतूक सुरु झाली आहे. दाजीपूर परिसरात साईड पट्टीला भुरूम टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मे महिन्यात या मार्गांवर साईड गटारीचे काम सुरु होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणासाठी १० मार्च ते ३० एप्रिल हा रस्ता पूर्ण पणे बंद करण्यात आला होता.
Kolhapur: राधानगरी-दाजीपूर मार्गांवरील वाहतूक सुरु, गेली ४५ दिवस वाहतुकीस बंद होता रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:27 IST