हाय व्होल्टेज वायर तुटून पडल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:17+5:302021-04-03T04:21:17+5:30

कसबा सांगाव, दि. २ : कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक इंसुलेटर तुटल्यामुळे मुडशिंगी ते ...

Traffic jam due to broken high voltage wire | हाय व्होल्टेज वायर तुटून पडल्याने वाहतूक ठप्प

हाय व्होल्टेज वायर तुटून पडल्याने वाहतूक ठप्प

कसबा सांगाव, दि. २ : कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक इंसुलेटर तुटल्यामुळे मुडशिंगी ते कर्नाटक मार्गावरील हलसवडे ते सोक्टास कंपनीच्या हद्दीपर्यंत २२० केव्ही शरावती पोलवरील तार तुटून खाली पडली. तार खाली पडल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही घटना सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या पोलवर विजेचा भार जास्त नसून ही लाईन ६३ कि.मी. एवढी आहे .जेव्हा विजेची कमतरता भासते, तेव्हाच चिक्कोडीला यातून वीजपुरवठा केला जातो. तार तुटण्याचे मुख्य कारण कारखान्यातील कार्बन, धूळ, राख व हवेतील आर्द्रता असून, यामुळे हा अपघात घडला असल्याचे महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. व्ही. परीट यांनी सांगितले.

तार तुटून पडताच तात्काळ परीट यांनी आपले कर्मचारी घेऊन पडलेल्या तारा तात्काळ वरती घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तीन तासात पूर्ववत लाईन चालू होईल, असे ते म्हणाले.

Web Title: Traffic jam due to broken high voltage wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.