गुणवत्तापूर्ण अलंकारांची परंपरा
By Admin | Updated: October 16, 2014 00:50 IST2014-10-16T00:13:22+5:302014-10-16T00:50:08+5:30
गोपीनाथ अनंत चिपडे सराफ : ‘लोकमत दीपोत्सव २०१४’ला प्रतिसाद

गुणवत्तापूर्ण अलंकारांची परंपरा
कोल्हापूर : उत्तम गुणवत्ता, सव्वाशे वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास हाच खरा दागिना मानून उत्तम सेवा देणाऱ्या मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीवर अॅँटिकसह नावीन्यपूर्ण दागिन्यांचे वैविध्य, सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत हिऱ्यांचे दागिने यांसह चांदीचे अलंकार उपलब्ध आहेत.
मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीला १२५ वर्षांपासूनची परंपरा आहे. कोल्हापुरात २१ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पेढीने गुणवत्तापूर्ण दागिने घडवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या या पेढीचे कामकाज बन्सी, मुरली, गिरी आणि तुषार चिपडे हे चार भाऊ सांभाळतात. या पेढीवर अँटिक दागिने, माणिक, मोती, पाचू अशा रत्नांचे अलंकार, एक ग्रॅमचे फॉर्मिंग दागिने व चांदीचे अलंकार उपलब्ध आहेत. याशिवाय मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीवर सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित आहेत.
दिवाळीसाठी मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीच्यावतीने ‘लोकमत दीपोत्सव २०१४’ या बक्षीस योजनेंतर्गत सोन्याचे दागिने व
होंडा अॅक्टिव्हा ही गाडी देण्यात येणार आहे.
‘लोकमत’ने जाहीर केलेल्या दीपोत्सव योजनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पेढीवर अलंकार खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक आवर्जून योजनेच्या कूपन्सची मागणी करतात.
- मुरलीधर चिपडे (मे. गोपीनाथ अनंत चिपडे)