शाहू महाराजांची विचार जपणारी परंपरा आजही करवीर तालुक्यात आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:34+5:302021-09-09T04:29:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : लोकराजा शाहू महाराज यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक निर्माण केलेली परंपरा जपणारी माणसे करवीर तालुक्यात ...

शाहू महाराजांची विचार जपणारी परंपरा आजही करवीर तालुक्यात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : लोकराजा शाहू महाराज यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक निर्माण केलेली परंपरा जपणारी माणसे करवीर तालुक्यात आजही अस्तित्वात असल्याने करवीर तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला आहे. यातीलच एक म्हणून खुपीरे गावात सहकाराचा वट वृक्ष निर्माण करणारे कुंभी कासारी कारखान्याचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील यांचे नाव गौरवाने घ्यावे लागेल, असे मत आमदार पी. एन पाटील यांनी काढले.
आज तुकाराम पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते. यावेळी तुकाराम पाटील यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील करवीर पंचायत समिती सभापती अविनाश पाटील दत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पी. जी. मेढे म्हणाले तुकाराम पाटील हे पक्के सहकार महर्षी आहेत. त्याच्याबरोबर काम करताना शेतकऱ्यांच्या पैशाचा अपव्यय होणार नाही याबाबत सक्त सुचना व मार्गदर्शन मिळाले. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, प्राचार्य शानेदिवान, सुभाना निकम, सरपंच दिपाली जांभळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पी. जी. शिंदे, शंकर पाटील, संभाजी पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावित आकाराम पाटील तर आभार उपसरपंच युवराज पाटील यांनी मानले.
080921\20210908_123610.jpg
खुपीरे ता. करवीर येथील तुकाराम पाटील यांचा सपत्नीक नागरी सत्कार करताना आ. पी एन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, प्रकाश मुगडे बाळासाहेब खाडेव इतर