विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:40+5:302021-04-30T04:29:40+5:30
शेणगाव ता भुुुदरगड येथून विनापरवाना लाकूड वाहतूक करणााऱ्या लाकडाने भरलेला ट्रॅक्टर गारगोटी वनविभागाने पकडला असून लाकूड व ट्रॅक्टर असा ...

विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर ताब्यात
शेणगाव ता भुुुदरगड येथून विनापरवाना लाकूड वाहतूक करणााऱ्या लाकडाने भरलेला ट्रॅक्टर गारगोटी वनविभागाने पकडला असून लाकूड व ट्रॅक्टर असा सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी शेणगाव येथील मंगल कार्यालयाजवळ बेकायदेशीर लाकूड वाहतूक करताना ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर, वनपाल सुरेखा लोहार, वनमजूर कोंडिबा मलगोंडा यांना पकडला. ट्रॅक्टरमध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीचे आंबा व सावरीचे लाकूड भरलेले होते. वनविभागाने लाकडाने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून याप्रकरणी आदित्य बळवंत पाटील (रा. निष्णप), ट्रॅक्टरमालक सागर श्रीपती रेडेकर (रा. पारदेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो
गारगोटी : वनविभागाने जप्त केलेला लाकडाने भरलेला ट्रॅक्टर आणि संशयित आरोपी