कोडोली येथे ट्रॅक्टर दुकानाच्या कंपाैंडमध्ये घुसला : एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST2021-01-03T04:24:53+5:302021-01-03T04:24:53+5:30

कोडोली : वाठार-बोरपाडळे राज्यमार्गावर विराज गॅस एजन्सीजवळच्या दुकानाच्या कंपाैंडमध्ये पिंजराने भरलेला ट्रॅक्टर घुसल्याने ...

Tractor rammed into shop compound at Kodoli: one seriously injured | कोडोली येथे ट्रॅक्टर दुकानाच्या कंपाैंडमध्ये घुसला : एक गंभीर जखमी

कोडोली येथे ट्रॅक्टर दुकानाच्या कंपाैंडमध्ये घुसला : एक गंभीर जखमी

कोडोली : वाठार-बोरपाडळे राज्यमार्गावर विराज गॅस एजन्सीजवळच्या दुकानाच्या कंपाैंडमध्ये पिंजराने भरलेला ट्रॅक्टर घुसल्याने रामचंद्र दगडू कापरे (वय ४०, रा. काखे ) हा गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

शुक्रवारी रात्री ट्रॅक्टर वाठारकडून पिंजर घेऊन काखेकडे जात होता. ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या महादेव ट्रेडर्स या खडी, वाळू विक्रीच्या दुकानाच्या तारेच्या कंपाैंडमध्ये घुसला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये दोघे जण बसले होते. यातील एक खाली पडल्याने त्याच्या डोक्यास जोरदार मार लागला, तर ट्रॅक्टरमध्ये बसलेला अन्य एक पसार झाला. जखमीवर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले .

Web Title: Tractor rammed into shop compound at Kodoli: one seriously injured