कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे रविवारी पर्यटकांनी तुडुंब भरलेली होती. करवीर निवासिनी अंबाबाईचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. डिसेंबर महिना असल्यामुळे नाताळची सुटी आधीच घेत अनेकांनी मुलांसह नातेवाइकांसोबत रविवारची सुटी सत्कारणी लावली.पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे रविवारी कोल्हापूर हाऊसफुल्ल झाले होते. बाहेरगावांहून आलेल्या पर्यटकांमुळे रविवारी कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर गर्दी होती. पुणे, मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, आदमापूर येथील बाळूमामा मंदिर, न्यू पॅलेस, किल्ले पन्हाळगड, नरसोबाचीवाडी या ठिकाणी गर्दी केली.
शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी आदी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने शहरातील हॉटेल्स, खासगी यात्री निवास, धर्मशाळा, तसेच घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल्ल होती.मंदिरात सकाळपासून गर्दीअंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी असल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसत होते. सायंकाळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. महाद्वार परिसरात अनेकांनी खरेदीचाही आनंद लुटला. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी आहे.
तीन लाख ४६ हजार ७१२ भाविक करवीर निवासिनी अंबाबाईचे दोन दिवसांत तीन लाख ४६ हजार ७१२ भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी १ लाख ५३ हजार २७४, तर रविवारी १ लाख ९३ हजार ४३८ भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले.
Web Summary : Kolhapur's tourist spots were crowded. Thousands visited Ambabai Temple due to the Christmas holiday. Pune and Mumbai tourists flocked to religious sites. Hotels and accommodations were full. Over 3.4 lakh devotees visited Ambabai in two days.
Web Summary : क्रिसमस की छुट्टी के कारण कोल्हापुर के पर्यटन स्थल पर्यटकों से भरे रहे। अंबाबाई मंदिर में हजारों भक्तों ने दर्शन किए। पुणे और मुंबई से आए पर्यटक धार्मिक स्थलों पर उमड़ पड़े। होटल और आवास भरे हुए थे। दो दिनों में 3.4 लाख से अधिक भक्तों ने अंबाबाई के दर्शन किए।