पर्यटकांचा सामना तबक उद्यानातील दुरवस्थेशी

By Admin | Updated: April 13, 2015 00:02 IST2015-04-12T23:18:36+5:302015-04-13T00:02:38+5:30

वनविभागाचे दुर्लक्ष : बैठक व्यवस्था, खेळणी उपलब्ध करणे गरजेचे

Tourists face panels in distant gardens | पर्यटकांचा सामना तबक उद्यानातील दुरवस्थेशी

पर्यटकांचा सामना तबक उद्यानातील दुरवस्थेशी

नितीन भगवान - पन्हाळा प्रवासी हंगाम सुरू झाला आहे. दररोज चारचाकींची रीघ लागते आहे. पर्यटक पन्हाळा बघून तबक वनउद्यानात दुपारच्यावेळी आसरा घेऊन, पुन्हा उर्वरित पन्हाळा पाहायचे; पण वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तबक वनउद्यानाची दुरवस्था झाली आहे.तबक उद्यानात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असून, लहानांसाठीची खेळणी मोडल्याने या बागेकडे पर्यटक आता फारसे येत नाहीत.पांढऱ्या, पिवळ््या व लालसर निळ््या शाडूमुळे नैसर्गिक गारवा असलेल्या या बागेत जुने, पण मोठे असे वृक्ष उभे आहेत. यात काही औषधी वृक्षसुद्धा आहेत. या झाडांमुळे बागेत पक्षीसंख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. बहुतेक पक्षीमित्र व अभ्यासक अजूनही या बागेचा फेरफटका मारताना दिसतात.बागेची सुधारणा करीत असताना नैसर्गिक समतोल न ढळता सुधारणा करणे आवश्यक आहे. राजदिंडीकडून बागेकडे येणारा रस्ता बागेच्या आसपास असणारी पांढरी, पिवळी आणि लालसर निळ््या शाडूची माती टाकून सुशोभित करणे गरजेचे आहे. बालोद्यान विभाग स्वतंत्र करून यात पारंपरिक खेळण्यांबरोबरच आधुनिक खेळणी बसविणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी हिरवळ व बैठक व्यवस्थेबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
पर्यटकांकडून मिळणारा कर आणि शासकीय निधी वापरून वनविभागाने आपल्या हद्दीतील इतर विहिरींचे पाणी या बागेत आणल्यास ही बाग सदा बहरत जाईल आणि जास्तीत जास्त पर्यटक या बागेकडे आकृष्ट होतील.

Web Title: Tourists face panels in distant gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.