शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मसाई पठारावरील पर्यटनाला चालना मिळणार, पांडवकालीन लेणी परिसराचे संवर्धन अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:03 IST

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध

नितीन भगवानपन्हाळा : मसाई पठारावरील मसाई मंदिरापासून जवळच असणाऱ्या पांडवदरा लेण्यांचे राज्य पुरातत्व विभागाकडून संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे पठारावरील पर्यटनास चालना मिळणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध असणारे, पावसानंतर फुलांनी बहरणारे, शासनाने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेले निसर्गरम्य मसाई पठार. याच पठाराच्या पश्चिमेला मसाई देवीच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावरील ''पांडवदरा'' नावाच्या दरीत पुरातन लेण्या आहेत. या लेण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. जोतिबा परिसरातील पोहाळे येथील लेणी आणि मसाई पठारावरील लेणी यामध्ये बरेच साधर्म्य आढळते. स्थानिक या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधतात. अलीकडील काळात काही संशोधकांच्या मते या गुहा बौद्धकालीन असाव्यात, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर गेल्या काही वर्षांत बौद्ध संघटनांतर्फे या परिसरात बुद्ध जयंती साजरी करण्यात येते.अलीकडे या लेणी परिसरात पर्यटकांकडून होणाऱ्या ओल्या पार्ट्या, कचऱ्याचे साम्राज्य, यामुळे या परिसरास अवकळा प्राप्त झाली होती. या गुहांच्या परिसरात बारमाही वाहणारा थंड पाण्याचा झरा असून, हा परिसर वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे येथे सोयीसुविधा करण्यास अडचणी येत होत्या.या लेण्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी परिसरातील नागरिक व इतिहास, निसर्गप्रेमींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासन स्तरावर हालचाली होऊन वनविभागाच्या ताब्यात असणारा हा परिसर राज्य पुरातत्व खात्याकडे वर्ग केला. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरणास निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली आहे. गुहांमधील खांबांचे बांधकाम व मजबुतीकरण, चौथऱ्यांचे बांधकाम, गुहांच्या वरील बाजूस संपूर्ण ग्रीलचे संरक्षण कुंपण तसेच दरीत उतरण्यासाठी सुशोभित पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. हा परिसर स्वच्छही केला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य खुलून दिसत आहे. याच गुहांच्या समोरून वाहणाऱ्या बारमाही झऱ्यांचे संवर्धन होणार आहे. या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरणामुळे मसाई पठारावर येणाऱ्या पर्यटकांबरोबरच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.जत्रांवर बंदी गरजेचीमसाई पठाराचे पावित्र्य जपण्यासाठी येथे असणाऱ्या गुहांमध्ये होणाऱ्या ओल्या पाटर्या, जत्रा यावर बंदी घालण्याची गरज आहे. वनविभाग व राज्य पुरातत्त्व खात्याने याची जबाबदारी घ्यावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन