शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जुना पूल बनणार पर्यटन केंद्र --सुशोभित करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:55 IST

पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे.

कोकणला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गाची गणना होते. या मार्गावर कोल्हापूर शहरानजिक असणारा ब्रिटिशकालीन शिवाजी पूल हा गेली १२५ वर्षे अनेक घटनांचा साक्षीदार बनून आजही खंबीरपणे उभा आहे; पण या पुलाचे आयुर्मान संपल्यामुळे आता त्याच्या शेजारीच पर्यायी पूल उभारला आहे. महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर गेल्या वर्षी पुरावेळी सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती; पण यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पर्यायी शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे; त्यामुळे महापुरावेळी प्रवाशांची गैरसोय टळेल.जुन्या पुलाची रुंदी सुमारे ५.५ मीटर असल्याने त्यावर सद्यस्थितीत दोन्हीही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी पुलाची रुंदी १३ मीटर असल्याने, पादचाºयासाठी स्वतंत्र पाथवे असल्यामुळे या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग विभागाने घेतला आहे.

नवीन पुलावरून जूनच्या दुसºया आठवड्यात वाहतूक सुरू होणार आहे, त्यानंतर जुन्या पुलाच्या प्रारंभी दोन्ही बाजूस किमान फूटभर उंच कठडा बांधून त्यावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच हा पूल हेरिटेज म्हणून पर्यटकांचे खास आकर्षण बनावे, यासाठी तो सुशोभित करण्यात येणार आहे. जुन्या पुलावर विद्युत रोषणाई, तसेच ज्येष्ठांसाठी खास बैठक व्यवस्था व सुरक्षा कठड्यावर रेलिंग करण्यात येणार आहे.संभाजीराजेंकडून पुलाची पाहणीबुधवारी दुपारी खासदार संभाजीराजे यांनी पर्यायी शिवाजी पुलास भेट देऊन, पुलाच्या उर्वरित कामाबाबत ठेकेदार एन. डी. लाड यांच्याकडून माहिती घेतली. तसेच जुन्या पुलाबाबतही राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदी उपस्थित होते.कोल्हापूर येथील पर्यायी शिवाजी पुलाच्या कामकाजाची खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी दौलत देसाई, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अशोक भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :riverनदीpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर