तोतया तहसीलदारास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:40+5:302021-04-14T04:21:40+5:30

रविवारी रात्री ट्रकचालक चंद्रकांत गुलाब जाधव रा. उंब्रज, ता. कऱ्हाड हे आपल्या ट्रकमधून जांभ्या दगडाची वाहतूक करीत कऱ्हाडकडे जात ...

Totaya tehsildar to police cell | तोतया तहसीलदारास पोलीस कोठडी

तोतया तहसीलदारास पोलीस कोठडी

रविवारी रात्री ट्रकचालक चंद्रकांत गुलाब जाधव रा. उंब्रज, ता. कऱ्हाड हे आपल्या ट्रकमधून जांभ्या दगडाची वाहतूक करीत कऱ्हाडकडे जात होते. रात्री पेरीड गावच्या हद्दीत नथुराम कांबळे व विष्णू पारळे या दोघांनी त्यांचा ट्रक अडवून वहातूक पास मागितला. मी तहसीलदार आहे, असा बहाणा करून, वाहतूक परवाना बनावट आहे असे म्हणत चालकाला दमबाजी करून मारहाण केली. ट्रक तहसील कार्यालयाकडे घ्यायला सांगत चालकाकडील रोख दोन हजार रुपये व परवाना काढून घेतला. घटनास्थळी जमाव गोळा झाल्याचे पाहून नथुराम कांबळे पळून गेला. जमावाने त्याच्या साथीदारास पकडून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तोतया तहसीलदार नथुराम कांबळे याला सापळा रचून शाहूवाडीत सोमवारी सायंकाळी अटक केली. त्याला मलकापूर - शाहूवाडी कोर्टात हजर केले असता दि. १६ एप्रिलपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Totaya tehsildar to police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.