जिल्ह्यात एकूण कोरोनाचे रुग्ण ५०० च्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST2021-03-23T04:26:47+5:302021-03-23T04:26:47+5:30
कोल्हापूर : गेले सलग तीन दिवस ८० हून अधिक असलेला कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ५१ ...

जिल्ह्यात एकूण कोरोनाचे रुग्ण ५०० च्या वर
कोल्हापूर : गेले सलग तीन दिवस ८० हून अधिक असलेला कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ५१ वर आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५२२ इतकी झाली आहे.
हातकणंगले तालुक्यात पाच, कागल एक, करवीर एक, शिरोळ चार, नगरपालिका अकरा, कोल्हापूर महापालिका २७, अन्य जिल्ह्यातील एक अशा एकूण ५१ नव्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दिवसभरात ३६० जणांची तपासणी करण्यात आली असून, ११३४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १०५ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.
चौकट
आठ दिवस पुरेल एवढी लस शिल्लक
सध्या जिल्ह्यात लसीकरण जोरात सुरू असून, आठ दिवस पुरेल एवढी लस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कोविशिल्डचे ३ लाख ३२ हजार ३८० डोस उपलब्ध असून, कोव्हॅक्सीनचे ३९ हजार ५८० डोस उपलब्ध आहेत. यातील १ लाख ९७ हजार ३९७ डोस देण्यात आले असून, १ लाख २० हजार डोस शिल्लक आहेत. आठ दिवस हे नागरिकांना पुरू शकतात असे सांगण्यात आले.