शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: October 13, 2023 14:05 IST

भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : स्वत: दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करून मराठा समाजाचा अवमान केला आहे. दुसऱ्याचे तळवे चाटून सत्तेत बसणाऱ्या भुजबळ यांनी मराठ्यांची कळ काढू नये, ते त्यांना महागात पडेल असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी दिला.जरांगे-पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सभेतील खर्चावर भाष्य करणाऱ्या मंत्री भुजबळ यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने येथील शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. 'मराठ्यांचा अवमान करणाऱ्या भुजबळांचा धिक्कार असो', 'दोन हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या भुजबळांचे करायचे काय', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, काळे फासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.बाबा इंदूलकर म्हणाले, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या भुजबळ यांनी पुन्हा जेलची हवा खायची नसेल तर वेळीच शहाणे व्हावे, त्यांनी मराठा समाजाची कळ काढू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल.यावेळी विजय देवणे, बाबा पार्टे, दिलीप देसाई, सुनिता पाटील, लता जगताप, गीता हसूरकर, कल्पना शेलार, पद्मावती पाटील, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे उपस्थित होते.भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीमंत्री भुजबळ यांनी जरागे-पाटील यांची सभा व ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करुन कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. मराठा-ओबीसी यांच्यात शत्रुत्व, दोष पसरविला आहे. त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्याने त्यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर कलम १६६, १५३-अ, १०३, १०४ या कलमांखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविशान कवठेकर यांच्याकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण