आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:51+5:302021-03-26T04:24:51+5:30

पेठवडगाव : घुणकी येथे विवाहित महिलेस पैशाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी सागर विश्वनाथ बुढ्ढे (वय ३६, रा.घुणकी) विरोधात ...

Torture a married woman by showing lure | आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार

आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार

पेठवडगाव : घुणकी येथे

विवाहित महिलेस पैशाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी सागर विश्वनाथ बुढ्ढे (वय ३६, रा.घुणकी) विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित फरार झाला आहे. हा प्रकार ८ नोव्हेंबर २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत घडला होता. गुरुवारी रात्री वडगाव पोलिसात पीडितेने नातेवाइकांच्या मदतीने फिर्याद दिली असून, तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस नाईक संतोष माने करीत आहेत.

अधिक माहिती अशी की, घुणकी (ता.हातकणंगले) येथे बुढ्ढे यांचा किराणा मालाचा व्यवसाय करत होता. यातून ‘त्या’ विवाहितेचा परिचय झाला होता. यातून मदत करण्याचा तसेच पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने चार महिन्यांपासून लाॅज व घरात शारीरिक संबंध ठेवले. तिचे अश्लील फोटो मोबाइलवर काढले. या फोटोच्या आधारे तिला शारीरिक त्रास दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हेच फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. दरम्यान, गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच संशयित बुढ्ढे हा फरारी झाला आहे.

Web Title: Torture a married woman by showing lure