शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहाची झाडाझडती, दोन मोबाईल, चार बॅटरी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:58 IST

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

ठळक मुद्देकळंबा कारागृहाची झाडाझडती, दोन मोबाईल, चार बॅटरी जप्तशरद शेळके यांनी घेतला पदभार

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके हे नोव्हेंबर २०१९ मध्ये पुणे येरवडा कारागृहात प्रशिक्षणासाठी गेले होते. दरम्यान, महादेव गावडे यांच्याकडे कारागृहाचा पदभार दिला होता. शेळके यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. ५) पुन्हा कळंबा कारागृहाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर दुपारी त्यांनी कारागृहाची झाडाझडती घेतली. तेव्हा एका ठिकाणी जमिनीमध्ये पुरून दोन मोबाईलसह चार बॅटरीही आढळून आल्या. त्या त्यांनी जप्त केल्या.कळंबा कारागृहात मोबाईल व सिमकार्ड सापडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारागृहातून न्यायालयात जाणारे कैदी, रुग्णालयात उपचारासाठी बाहेर गेलेले कैदी चोरून असे मोबाईल आत आणत असल्याचे बोलले जात आहे. जप्त केलेले मोबाईल कोणाचे आहेत, ते कोणी लपविले याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला जाईल, असेही शेळके यांनी स्पष्ट केले आहे.काटेकोरपणे झाडाझडती आवश्यककारागृहातून बाहेर जाणाऱ्या व कारागृहात परत येणाऱ्या प्रत्येक कैद्याची काटेकोरपणे झडती घेण्यासाठी कारागृहाचे कर्मचारी नेमलेले असतात. तरीसुद्धा असे प्रकार घडत आहेत; त्यामुळे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने या वस्तू कारागृहात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा कैद्यांची काटेकोरपणे व प्रामाणिकपणे झडती घेणे आवश्यक बनले आहे. एकूणच, या घटनांमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :jailतुरुंगkolhapurकोल्हापूर