शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST2021-03-20T04:23:17+5:302021-03-20T04:23:17+5:30

नृसिंहवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ६६० जणांनी कोविड लस घेतली आहे. या केंद्रांतर्गत ...

Top Brief News | शिरोळ संक्षिप्त बातम्या

शिरोळ संक्षिप्त बातम्या

नृसिंहवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ६६० जणांनी कोविड लस घेतली आहे. या केंद्रांतर्गत औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, शेडशाळ ही गावे येतात. वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग पाखरे यांच्यासह कर्मचारी लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत.

---------------------------

जामिया खैरुल उलूमकडून सत्कार

उदगांव : उदगांव (ता. शिरोळ) येथील जामिया खैरुल उलूमकडून समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, सरपंच कलीमून नदाफ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मौलाना अब्दुल मजीद यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा विषद केला. संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून लागेल ती मदत करू, असे आश्वासन सासणे यांनी दिले. याप्रसंगी उपसरपंच अ‍ॅड. हिदायत नदाफ, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, बकश पेंढारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते.

Web Title: Top Brief News