शिरोळ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:05+5:302021-09-25T04:25:05+5:30
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात अस्वच्छता पसरली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जात असताना भिंतीच्या कोपऱ्यामध्ये पान व गुटखा ...

शिरोळ संक्षिप्त बातम्या
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात अस्वच्छता पसरली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जात असताना भिंतीच्या कोपऱ्यामध्ये पान व गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याला आळा बसावा म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या असल्यातरी थुंकणाऱ्या नागरिकांमध्ये परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाईची गरज आहे.
----------------------
वाहने हटविण्याची गरज
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय परिसरात जप्त केलेल्या वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा वाहनांचा लिलाव काही तांत्रिक कारणामुळे थांबला असला तरी स्क्रॅप होत चाललेली वाहने परिसरातून हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
------------------
जयसिंगपूर बसस्थानकासमोर मुरमीकरण
जयसिंगपूर : येथील नव्या बसस्थानकाच्या बांधकामामुळे अनेक सोयी उपलब्ध होणार आहेत. नूतनीकरणाच्या माध्यमातून बसथांब्यासमोर मुरमीकरण करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याला आळा बसणार आहे. दरम्यान, बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.