शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक,डाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:28 IST

तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.

ठळक मुद्देतोतापुरी, लालबाग आंब्याची आवकडाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

कोल्हापूर : तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.सध्या बाजारात हापूस आंब्यांची रेलचेल सुरू आहे. त्यात कोकणातील हापूसची आवक काहीशी मंदावली असून, मद्रास हापूस मात्र जोेरात आहे. दोन्ही आंबे दिसायला सारखेच असले तरी चवीत थोडा फरक जाणवतो. कोकण हापूसची पेटी सरासरी १२५० रुपये, तर २२५ रुपये बॉक्सचा दर आहे. त्या तुलनेत मद्रास हापूसची पेटी ९०० रुपये, तर २०० रुपये बॉक्सचा दर राहिला आहे. त्याशिवाय मद्रास पायरीचीही आवक सुरू झाली असून, त्याचा दर हापूसच्या तुलनेत पेटीमागे २०० रुपयांनी कमी आहे.

हापूसचा दर अद्यापही थोडा तेजीत असला तरी सामान्य ग्राहकांना लालबाग आंब्याने दिलासा दिला आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)

यंदा हापूस बाजारात असतानाच तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली आहे. तोतापुरीची आवक कमी असली तरी दर मात्र आवाक्यात आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये नगाचा दर आहे. लालबागचा आंबाही आवाक्यात असून ६० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे.कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. विशेष करून पालेभाज्यांची आवक मंदावल्याने दर चांगलेच भडकले आहेत. किरकोळ बाजारात मेथी २० रुपये, तर कोथिंबिरीचे दरही त्याच्या जवळपासच आहेत. वांग्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून, टोमॅटोही २० रुपये किलोपर्यंत आहे. ढबू, कारली, दोडक्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. ओला वाटाणा पुन्हा बाजारात दिसत असून दर मात्र ८० रुपये किलो आहे.वर्षभर स्थिर असणाऱ्या कडधान्यांच्या दरांत वाढ होऊ लागली आहे. तूरडाळ ९० रुपये, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, मटकी १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. ऐन चटणीच्या हंगामात मिरचीसह खोबरे व मसाल्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. ब्याडगी १६०, गुंटूर १४० रुपये किलो आहे. शाबूने तर शंभरी गाठली असून, साखर व सरकी तेल मात्र स्थिर आहे.मक्याला दोन वर्षांतील उच्चांकी दरमक्याचे उत्पादन घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १० ते १२ रुपये किलोचा दर होता. या वर्षी १८ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, आगामी महिन्याभरात २२ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

कांदा-बटाटा स्थिरकांद्याची आवक थोडी वाढली आहे. घाऊक बाजारात कांदा ११ रुपये, तर बटाटा १६ रुपये किलोपर्यंत आहे. लसणाने मात्र थोडी उसळी घेतली आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर