शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:54 IST

रोहित तवंदकर दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. ...

रोहित तवंदकरदानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. कोबी, ढबू, फ्लॉवर, टोमॅटो या प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत पाठविली जातात. सध्या टोमॅटो पिकाला भाव नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहून कुजत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.दानोळी परिसरातील कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे गावांमधून टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोला दर मिळत नसल्याने काढणीचाही दर परवडेनासा झाला आहे. मालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. खर्चापेक्षा तीन ते चार पट फायदा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. या वर्षी सुरुवातीला टोमॅटोला शंभर रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले; परंतु पीक आल्यानंतर दर ढासळल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी काढणीचाही खर्च निघत नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहिल्यामुळे ते कुजत आहे. दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा शेतातील उभ्या पिकावर शेतकऱ्याला नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे मालाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मोठ्या मेहनतीने शेतकरी शेतात फळभाज्या करत असतो; पण त्या मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देश वाचविण्यासाठी बळीराजा जगला पाहिजे यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - पोपट शिंदे, शेतकरी, दानोळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी