अवजड वाहनांनाच टोल
By Admin | Updated: March 21, 2016 00:32 IST2016-03-21T00:31:31+5:302016-03-21T00:32:40+5:30
चंद्रकांतदादा पाटील : सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय वसुलीला परवानगी देणार नाही; आंदोलन कशासाठी?

अवजड वाहनांनाच टोल
सांगली : एस.टी., स्कूल बसेस, छोट्या चारचाकींना टोलच लागणार नाही. त्यामुळे सांगलीत आंदोलन कशाकरिता केले जात आहे? असा सवाल उपस्थित करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर टोल सुरू राहण्याचे स्पष्ट संकेत रविवारी येथील कार्यक्रमात दिले. विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक ते वृंदावन कॉलनी या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ रविवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीने पालकमंत्र्यांना टोल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, केवळ मोठ्या वाहनांनाच टोल लागणार आहे. तसेच ठेकेदार कितीही उड्या मारत असला तरी, ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली सुरू होऊ देणार नाही. टोल सुरू करण्याचे पत्र माझ्याच स्वाक्षरीने देण्यात येते. त्यामुळे सर्व गोष्टींची शहानिशा करूनच टोलला परवानगी दिली जाईल. केवळ अवजड वाहनांना टोल बसणार असल्याने, सांगलीमध्ये कोणत्या कारणासाठी आंदोलन सुरू आहे, हे (पान ११ वर)
कामाची चौकशी करू
सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या संपूर्ण कामाची त्रयस्थ विभागामार्फत चौकशी केली जाईल. काम नियमानुसार झाले असेल तरच टोलसाठी परवानगी मिळेल; अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे याबाबत सांगलीकरांनी कोणतीही चिंता करू नये, असे स्पष्टीकरण पालकमंत्र्यांनी केले.
तरीही टोल लागू शकतो
कृती समितीने रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात सांगली-कोल्हापूर रस्त्याचा समावेश करण्याची मागणी केली. यावर चंद्रकांतदादा म्हणाले की,
राष्ट्रीय महामार्गात या
रस्त्याचा समावेश केला तरी,
टोल लागू शकतो.
वाहतूकदार संघटना नाराज
पालकमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले की, आम्ही सांगली-कोल्हापूर रस्त्याला चौपदरी रस्ता म्हणायचे तरी कसे? हा रस्ता अजूनही अरुंद आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून टोल सुरू झाला, तर आमचा त्यास विरोध राहील.