महिन्याभरात टोलचा प्रश्न सुटेल : सतेज पाटील
By Admin | Updated: July 5, 2014 00:06 IST2014-07-04T22:52:31+5:302014-07-05T00:06:45+5:30
तोपर्यंत तोडगा निघणार नाही...

महिन्याभरात टोलचा प्रश्न सुटेल : सतेज पाटील
कोल्हापूर : लोकांच्या आंदोलनाचा आणि सर्वाधिक रोषाचा विषय बनलेला शहरातील टोलचा प्रश्न येत्या महिन्याभरात सुटेल, असा आशावाद गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जोपर्यंत केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन होत नाही, तोपर्यंत त्यावर तोडगा निघणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टोलप्रश्नी सर्वपक्षीय कृती समितीने पुन्हा एकदा कोल्हापुरात मंत्र्यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. कोल्हापूरकरांना टोलमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. सध्या शहरात ‘आयआरबी’कडून झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकनासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती पुन्हा येऊन पाहणी करणार असून, कामाचे सॅम्पल घेणार आहेत. अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.