टोल प्रश्नी पालकमंत्री काय करू शकतात?
By Admin | Updated: June 27, 2014 01:12 IST2014-06-27T01:11:42+5:302014-06-27T01:12:41+5:30
हर्षवर्धन पाटील यांची हतबलता

टोल प्रश्नी पालकमंत्री काय करू शकतात?
कोल्हापूर : टोलचा प्रश्न हा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित नाही. याचा अंमल राज्यभर लागू होणार आहे. मूल्यांकन समितीचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्री स्तरावरच याचा निर्णय घेतला जाईल. टोल प्रश्नी पालकमंत्री काय करू शकतात, अशी हतबलता आज, गुरुवारी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आपली विनंती धुडकावून लावत आयआरबीने शहरातील टोलवसुली सुरू केली. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, टोलबाबत संपूर्ण राज्याचे धोरण नव्याने ठरविले जात आहे. कोल्हापूरला टोल मुक्त करण्यासाठी शासन पाऊले टाकत आहे.
टोल हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. एकट्या कोल्हापूरसाठी स्वतंत्र विचार करता येणार नाही. यासाठी थोडी कळ सोसा, मुख्यमंत्र्यांच्या दारात उपोषण करून काही उपयोग होणार नाही. मूल्यांकन समितीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मी स्वत:, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आम्ही सर्व बसून कोल्हापूरचा टोल प्रश्न मार्गी लावू. (प्रतिनिधी)