शहरं
Join us  
Trending Stories
1
मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
2
अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?
3
शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन
4
राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!
5
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
6
USA vs IND : "भारत मजबूत संघ असला तरी...", अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 
7
पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं
8
Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!
9
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
10
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
11
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
12
'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...
13
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
14
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
15
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
16
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
17
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
18
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
19
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
20
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम

टोल राक्षसाचे दहन

By admin | Published: May 14, 2014 12:48 AM

कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विश्वासघातकी आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत टोलरूपी राक्षसाचे

 कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विश्वासघातकी आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत टोलरूपी राक्षसाचे मंगळवारी (दि. १३) शिवसेनेने मंंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात दुपारी दहन केले. या आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू अशा वल्गना केल्या होत्या. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन विश्वासघात केला आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. कोल्हापुरात या आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा राक्षस मारला. टोलबरोबरच टी.डी.आर., जनता बझार, आदी प्रकरणातसुद्धा हीच मंडळी आपल्या बगलबच्च्यांना आश्रय देण्याचे काम करीत आहेत. टोलविरोधात जनतेतून आगडोंब उसळल्यानंतर या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू, असे आश्वासन दिले होते. त्यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी आपण आपल्या पदावर राहणे योग्य आहे का? याचे चिंतन करणे गरजेचे आहे, अन्यथा लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत जनता तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला. आंदोलनात रवी चौगुले, दिलीप पाटील (कावणेकर), बाजीराव पाटील, विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, अजिंक्य चव्हाण, संदीप पाटील, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, बाळासाहेब माने, दिलीप जाधव, राजू सांगावकर, किरण माने, सुरेश पाटील, दिलीप देसाई, प्रफुल्ल पन्हाळकर, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, रेहना खान, आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)