शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बागेत खेळताना घसरगुंडीत अडकून चिमुकलीची करंगळी तुटली, जबाबदार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:01 IST

कोल्हापूर : बागेत खेळताना फाटलेल्या घसरगुंडीमध्ये करंगळी अडकल्याने ती तुटल्याची घटना गेल्या शुक्रवारी (दि. १४) ताराबाई पार्कातील आकार बागेत ...

कोल्हापूर : बागेत खेळताना फाटलेल्या घसरगुंडीमध्ये करंगळी अडकल्याने ती तुटल्याची घटना गेल्या शुक्रवारी (दि. १४) ताराबाई पार्कातील आकार बागेत सायंकाळी घडली. अक्षरा अमोल सोनवणे (वय-३) असे या मुलीचे नाव आहे.सोनवणे कुटुंब मूळचे ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) आहे. ते गेली काही वर्षे माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या बंगल्यात वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची मुलगी शेजारीच असलेल्या बागेत खेळायला गेली असता पत्र्याची घसरगुंडी फाटलेली होती. घसरगुंडीवरून वेगात खाली येताना नेमकी तिच्या डाव्या पायाची करंगळी त्यात जोरात अडकली व ती तुटली. रक्तबंबाळ स्थितीत तिला पालकांनी सीपीआर रुग्णालयात तातडीने नेले; परंतु तिथे गेल्यानंतर करंगळी तुटल्याचे लक्षात आले. तेव्हा करंगळी घसरगुंडीतच अडकली होती. तिला माती लागली होती व काही वेळ गेल्याने डॉक्टरांनी आता ती जोडता येणार नाही. त्यातून काही जंतुसंसर्ग होईल, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे करंगळी न जोडताच छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारीच तिच्या पायाचे बँडेज काढले आहे. त्यामुळे उमलत्या वयातच तिला करंगळी गमवावी लागली.आता तिला विनाकरंगळीचे आयुष्य काढावे लागणार आहे. करंगळी तुटली असल्याने तिला अपंगत्वाचा दाखला मिळणार नाही. पोलिस भरती किंवा तत्सम सेवेत जाताना अडचणी येतील शिवाय लग्नाच्या वेळीही त्रास होईल, अशी भीती तिच्या आईवडिलांना वाटत आहे. त्यामुळे या अपघाताची नुकसानभरपाई मिळावी असे कुटुंबीयांना वाटते. परंतु त्यासाठी नेमकी दाद कुणाकडे मागावी असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.

जबाबदार कोण?ही बाग स्थानिक सोसायटीने विकसित केली आहे. घसरगुंडी खराब झाल्याचे त्यांना यापूर्वीच कळवले होते; परंतु त्याकडे कुणी लक्ष दिले नसल्याचे सांगण्यात येते. आमचा या बागेशी संबंध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मालकीच्या उद्यानातील खेळण्यांची स्थिती यापेक्षा फार चांगली आहे असे नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर