वसतिगृहांची आजपासून पाहणी _‘लोकमत’चा दणका

By Admin | Updated: July 22, 2014 00:43 IST2014-07-22T00:17:39+5:302014-07-22T00:43:11+5:30

विजयकुमार गायकवाड : अधीक्षकांकडून लेखी खुलासा

Today's survey of 'hostels' | वसतिगृहांची आजपासून पाहणी _‘लोकमत’चा दणका

वसतिगृहांची आजपासून पाहणी _‘लोकमत’चा दणका

कोल्हापूर : प्राथमिक सुविधांची कमतरता, सकस आहारांतील त्रुटी आणि वसतिगृहांची झालेली दुरवस्था, याबाबतचा लेखी खुलासा तातडीने देण्याचे आदेश आज, सोमवारी जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृहांच्या अधीक्षकांना समाजकल्याण सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी दिले. उद्या, मंगळवारपासून या वसतिगृहांची गायकवाड हे पाहणी करणार आहेत.
‘लोकमत’ टीमने शुक्रवारी (दि. १८) जिल्ह्यातील १६ वसतिगृहांचे स्टिंग आॅपरेशन करून वास्तव मांडले. त्यावर गायकवाड यांनी वसतिगृह अधीक्षकांची बैठक घेतली. सुमारे दोन तास ही बैठक चालली.
गायकवाड म्हणाले, वसतिगृह अधीक्षकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आज बैठक घेतली. त्यात संबंधित अधीक्षकांना वसतिगृहांतील प्राथमिक सुविधांची कमतरता, सकस आहारातील त्रुटी आणि वसतिगृहांची झालेली दुरवस्था याबाबतचा लेखी खुलासा तातडीने उद्या सायंकाळपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी भाडेतत्त्वावरील इमारती, घरांमध्ये वसतिगृह आहे. तेथील इमारतीच्या दुरवस्थेबाबत घरमालकांना आणि आहारातील त्रुटींबाबत ठेकेदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या आहेत. ठेकेदारांनी सकस आहार देण्याच्यादृष्टीने तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. पाहणीदरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. (प्रतिनिधी)

शालेय व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांची वसतिगृहांतील
प्रवेश यादी उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होईल.

Web Title: Today's survey of 'hostels'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.