महापालिकेची आजपासून शाहू व्याख्यानमाला

By Admin | Updated: December 15, 2014 23:57 IST2014-12-15T23:42:35+5:302014-12-15T23:57:35+5:30

विद्यार्थ्यांना आवाहन : स्पर्धा परीक्षांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Today's Shahu lecture series from the corporation | महापालिकेची आजपासून शाहू व्याख्यानमाला

महापालिकेची आजपासून शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : महापालिकेच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या, मंगळवारपासून श्री भास्करराव जाधव वाचनालयातर्फे ‘राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला’ सुरू होत आहे. यंदाच्या वर्र्षी स्पर्धा परीक्षेवर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि. २०)पर्यंत पाच दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेतर्फे सुरुवातीच्या काळात ही व्याख्यानमाला विठ्ठल रामजी चौकात होत होती. त्यानंतर गेली तीन वर्षे ही व्याख्यानमाला केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असल्याने गांधी मैदान येथील भास्करराव जाधव वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यानमाला होत आहे.
स्पर्धा परीक्षा व त्याचे महत्त्व ओळखून आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत सायंकाळी
पाच वाजता मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसह पालकांना होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's Shahu lecture series from the corporation