मुस्लिम बोर्डिंगसाठी रविवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:56 IST2017-09-23T17:49:57+5:302017-09-23T17:56:22+5:30
‘जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची नामवंत संस्था’ म्हणून ओळखणाºया येथील मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मुस्लिम बोर्डिंगसाठी रविवारी मतदान
कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची नामवंत संस्था’ म्हणून ओळखणाºया येथील मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांत रंगलेल्या व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया या निवडणुकीसाठी संपूर्ण मुस्लिम समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण १५ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सायंकाळी आठ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकारी नूरमहंमद फक्रुद्दीन मुजावर व सहायक निवडणूक अधिकारी मियॉँलाल आप्पालाल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे.
संस्थेची त्रैवार्षिक निवडणुकीची मुदत सन २०१० ला संपली होती; पण त्यानंतर ही निवडणूक विविध कारणांस्तव न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती. एकूण २३०० मतदार असून त्यांतील मृत व हरकती आलेल्या मतदारांची नावे कमी होऊन किमान १५५० मतदान निवडणुकीसाठी पात्र ठरत आहेत.
चेअरमनपदासाठी चार, उपाध्यक्षपदासाठी दोन, प्रशासकपदासाठी तीन, सुपरिंटेंडेंट पदासाठी चार पदांसह संचालकांच्या नऊ जागांसाठी २५ असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी फताह उल आभिमन जुने पॅनेल, विरोधी राजर्षी शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन या दोन पूर्ण पॅनेलसह चाँद-तारा आघाडी, इकरा नवीन अशा चार पॅनेलद्वारे उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.