‘कुंभी’साठी आज मतदान
By Admin | Updated: December 27, 2015 01:30 IST2015-12-27T01:12:22+5:302015-12-27T01:30:25+5:30
१0५ केंद्रांवर साहित्य रवाना : २० जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात

‘कुंभी’साठी आज मतदान
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज, रविवारी होत आहे. यासाठी रमणमळा येथून दुपारी अडीच वाजता मतदान साहित्य विविध तालुक्यांतील १०५ केंद्रांवर रवाना करण्यात आले.
कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या २० जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटातून सत्तारूढ गटाचे आनंदराव माने हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. रविवारी सकाळी
आठ ते सायंकाळी पाच या वेळेत करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांतील १०५ केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी शनिवारी दुपारी मतदान साहित्य रवाना झाले.
१०५ केंद्रांवर ६५० कर्मचारी तैनात केले असून, पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पवार काम पाहत
आहेत. त्यांना सहायक म्हणून करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे व करवीरचे सहायक निबंधक
प्रदीप मालगावे कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)