न्याय विधिखात्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक
By Admin | Updated: November 21, 2014 00:32 IST2014-11-20T23:56:52+5:302014-11-21T00:32:48+5:30
सदस्यांशी चर्चा : व्यवस्थापन समितीच्या कागदपत्रांची तपासणी

न्याय विधिखात्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक
कोल्हापूर : न्याय व विधिखात्याच्या अधिकाऱ्यांनी आज, गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मुख्य कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. उद्या, शुक्रवारी सकाळी समितीच्या सदस्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या न्याय व विधिखात्याचे आठ अधिकारी काल, बुधवारपासून देवस्थान समितीच्या कागदपत्रांची व व्यवहारांची तपासणी करीत आहेत. काल अंबाबाई मंदिराची पाहणी केल्यानंतर ते जोतिबा देवस्थानला जाणार होते. मात्र, तेथे न जाता त्यांनी थेट राधानगरी धरणाचे पर्यटन केल्याची धक्कादायक माहिती समजली. आज सावंतवाडी येथे अधिकाऱ्यांचा दौरा होता. मात्र, त्यांनी तो रद्द करून समितीच्या बलभीम बँक येथील मुख्य कार्यालयात तळ ठोकला. येथे समितीच्या व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र, ही तपासणी किती गांभीर्याने करण्यात आली, याबाबत मंदिराशी निगडित सर्वच घटकांकडून व भाविकातून साशंकता व्यक्त होत आहे. उद्या सकाळी अकरा वाजता त्यांनी देवस्थान समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे.