भाग घेण्याची आज शेवटची संधी

By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:51:05+5:302014-08-17T00:53:27+5:30

लोकमत छायाचित्र स्पर्धा : निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन

Today's last chance to take part | भाग घेण्याची आज शेवटची संधी

भाग घेण्याची आज शेवटची संधी

कोल्हापूर : कोल्हापूरचे अलौलिक सौंदर्य टिपण्यासाठी लोकमत उमंग अंतर्गत व राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विद्यमाने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची उद्या, रविवारी शेवटची संधी असून इच्छूकांनी आपली छायाचित्रे संंध्याकाळपर्यंत लोकमतच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गस्थळे / पर्यटन स्थळे’ असा विषय दिला आहे. निवडलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनच्या कलादालनात १९ व २० आॅगस्ट रोजी होईल. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता होणार आहे. ही स्पर्धा हौशी व व्यावसायिक अशा दोन गटांत होणार आहे. त्यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा व त्याला पांढऱ्या रंगातील माउंट असावेत. छायाचित्रास योग्य ते शीर्षक द्यावे व त्यामागे आपले नाव लिहावे. छायाचित्रावर संगणकीय काम केलेले नसावे. छायाचित्र स्पर्धेसाठी निवडण्याचा अधिकार समितीचा आहे; परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेली ही छायाचित्रे या प्रदर्शनात लावली जातील.
प्रथम क्रमांक विजेत्याला तीन हजारांचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रुपये दोन हजारांचे व तृतीय विजेत्यास एक हजाराचे बक्षीस दिले जाईल. शिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. इच्छुकांनी छायाचित्र १७ तारखेपर्यंत ‘लोकमत’च्या कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथील कार्यालयात जमा करावे, असे आवाहन केले आहे. प्रदर्शनात मांडणाऱ्या छायाचित्रांच्या विक्री निधीतील रक्कम ‘स्वयंम स्कूल फॉर स्पेशल चाईल्ड’ या संस्थेला देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's last chance to take part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.