आजºयात हत्ती घुसल्याने तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:53 IST2017-08-19T00:53:01+5:302017-08-19T00:53:01+5:30

आजºयात हत्ती घुसल्याने तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजरा शहरातील रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ येथे भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हत्ती घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत निमजगा माळ येथील झाडीत गेलेला हत्ती हुसकावून लावण्यासाठी पोलीस कर्मचारी व वनखात्याच्या कर्मचाºयांचे प्रयत्न सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेले दोन दिवस मसोली येथे धुमाकूळ घालणारा हत्ती शुक्रवारी दुपारी मुल्ला कॉलनीमार्गे निमजगा माळ येथे आला. मोहिते वाळू सप्लायर्स यांच्या गांधीनगर रस्त्याशेजारील डेपोजवळील रस्ता ओलांडण्याचा हत्ती प्रयत्न करीत असतानाच दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. पुन्हा हत्ती ‘मंजिरी’ नावाने ओळखल्या जाणाºया भागातील झाडीत घुसला.
शुक्रवार आठवडा बाजारा दिवस असल्याने हत्ती शहरात आल्याचे समजताच रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ परिसरातनागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पोलीस कर्मचारी व वनखात्याच्या कर्मचाºयांनी तातडीने येऊन सुतळीबॉम्बचा वापर करून हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालविला होता.
फोटो काढताना तिघे जखमी
नागरिकांची प्रचंड गर्दी व गोंधळ यामुळे या प्रयत्नांना यश आले नाही. या भागातील रहिवाशी मात्र भीतीच्या छायेखाली आहेत. हत्तीचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात असणाºया नितीन बुरुड, हेमंत डोंगरे या तरुणांच्या मागे हत्ती लागल्याने ते किरकोळ जखमी झाले.