शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:15 AM

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार प्रमुख उपस्थित आणि अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असणार आहेत. या वर्षी ५० हजार ४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. यातील २४ ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार प्रमुख उपस्थित आणि अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असणार आहेत. या वर्षी ५० हजार ४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. यातील २४ हजार २४५ स्नातक हे प्रत्यक्षात उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत.सन २०१७-१८ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यांतील गुणवत्ताप्राप्त तसेच व्यक्तिमत्त्व, वर्तणूक व नेतृत्वगुण यांबाबतचे विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील हिला, तर वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे हिला एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. विविध विद्याशाखांतील एकूण ४९ संशोधक विद्यार्थिनींना पीएच. डी. व एम. फिल. पदवी आणि विविध गुणवत्ताप्राप्त ३५ विद्यार्थ्यांना व्यासपीठावर पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. या समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीचे उद्घाटन सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते होईल. कमला कॉलेज, जनता बझार, राजारामपुरी, माउली चौक, सायबर चौकामार्गे विद्यापीठातील लोककला केंद्रात ग्रंथदिंडीचा समारोप होईल. सायंकाळी पाच वाजता लोककला केंद्रामध्ये मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.बापलेक घेणार कायद्याची पदवीतुरंबे (जि. कोल्हापूर) : शिकण्याची अखंड जिद्द बाळगत सेवानिवृत्तीला अवघी सात वर्षे बाकी असताना कुंडलिक पांडुरंग हातकर यांनी कायद्याची पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी स्नेहलनेही कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आज, सोमवारी होणाºया दीक्षांत समारंभात बापलेकींचा एकाचवेळी गौरव होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल या बापलेकीचे कौतुक होत आहे. तुरंबे (ता. राधानगरी) येथील हातकर व त्यांची मुलगी स्नेहल यांनी एकाचवेळी एकाच महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.