शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
4
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
5
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
7
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
8
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
9
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
10
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
11
Pravin Tarde राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
12
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
13
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
14
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
15
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
16
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
17
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
18
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:54 AM

महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगणार स्नेहमेळावालोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजविघातक शक्तींना विरोध व समाजमनाचा आरसा असलेल्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत प्रबोधनाची भूमिका बजावणाºया ‘लोकमत’चा आज, सोमवारी तेरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहाजवळील महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा ...

महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगणार स्नेहमेळावालोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजविघातक शक्तींना विरोध व समाजमनाचा आरसा असलेल्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत प्रबोधनाची भूमिका बजावणाºया ‘लोकमत’चा आज, सोमवारी तेरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहाजवळील महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर कोल्हापूरमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यासह शहरातील विविध प्रश्नांची मांडणी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली संघर्षाची भूमिका, विधायकतेला प्रोत्साहन आणि समाजबदलाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत जे चांगले आहे, त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिका ‘लोकमत’ सक्षमपणे बजावीत आहे. त्यामुळे वाचकांचा ‘लोकमत’ला उत्स्फूर्त प्रतिसाद व भक्कम पाठबळ मिळत आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या विशेषांकाचा विषय ‘डिजिटल लाईफ’ असा आहे. दर्जेदार अशा या पुरवणीचे प्रकाशन आज, सोमवारी साडेदहाच्या सुमारास करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अंक समर्पित करून होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेआठपर्यंत स्नेहमेळावा होणार आहे.‘लोकमत इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’, ‘बाल विकास मंच’च्या माध्यमांतून ‘लोकमत’ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्याबळावरच ‘लोकमत’ वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस बळ द्यावे.‘डिजिटल लाईफ’ विशेषांकाविषयी...आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे आणि डिजिटलचे आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपले आयुष्य असंख्य गॅझेटस्नी व्यापले आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय आपण राहूच शकत नाही, अशी एक सामाजिक स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञान आपली कामे अल्लाउद्दीनच्या चिरागमधील जीनप्रमाणे चुटकीसारखी पूर्ण करते. याच घरातील लहान-मोठ्या वस्तूंपासून मोबाईल, इंटरनेट, संगणक, शेती, सहकार, बँकिंग, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, नोकरी अशी सर्वच क्षेत्रे या डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापली आहेत. ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित होत असलेल्या विशेषांकामध्ये या ‘डिजिटल लाईफ’चे जग उलगडण्यात आले आहे.स्थळ : शासकीय विश्रामगृहाजवळीलमहासैनिक दरबार हॉलवेळ : सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत