पर्युषणपर्वानिमित्त आज रथोत्सव- बाहुबली येथे होणार सांगता

By Admin | Updated: September 1, 2014 23:49 IST2014-09-01T23:27:32+5:302014-09-01T23:49:47+5:30

जैन मंदिरात सामूहिक जिनस्तवन

Today will be held in the Rathotsav-Bahubali on the occasion of Purushottam | पर्युषणपर्वानिमित्त आज रथोत्सव- बाहुबली येथे होणार सांगता

पर्युषणपर्वानिमित्त आज रथोत्सव- बाहुबली येथे होणार सांगता

कोल्हापूर : पर्वाधिराज पर्युषण महोत्सवानिमित्त शहरातील विविध जैन मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत जैन सेवा संघ तसेच श्री जैन सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रोज एका जैन मंदिरात सामूहिक जिनस्तवन (प्रार्थना) होणार आहे. यासह उद्या, मंगळवारी शाहूपुरी जैन मंदिराच्यावतीने सकाळी ९ वाजता रथोत्सव होणार आहे.
शाहूपुरी जैन मंदिरातून रथोत्सवाला सुरुवात होईल. पाच बंगला, व्हीनस कॉर्नर, व्यापारी पेठमार्गे शाहूपुरी येथे रथोत्सवाची सांगता होईल. तसेच श्री जैन सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रोज सकाळी ८ वाजता भगवान नेमिनाथ जैन मंदिर, पार्श्वनाथ जैन मंदिर, केसापूर पेठ, चंद्रप्रभ जैन मंदिर, कासार गल्ली, चंद्रप्रभ जैन मंदिर, रविवार पेठ, पार्श्वनाथ जैन मंदिर, गंगावेश, आदिनाथ जैन मंदिर आर. के. नगर, पार्श्वनाथ जैन मंदिर, कद्रे गल्ली, शांतिनाथ जैन मंदिर, शनिवार पेठ, चंद्रप्रभ जैन मंदिर, लक्ष्मीसेन जैन मठ, जैन श्राविकाश्रम लक्ष्मीपुरी, पद्मावती मंदिर, पद्माळा, श्री जिनसेन मठ, कासार गल्ली या सर्व जैन मंदिरांत सामूहिक जिनस्तवन आयोजित केले आहे. या महोत्सवाची सांगता बाहुबली (ता. हातकणंगले) येथे सकाळी साडेदहा वाजता प्रार्थना व पारितोषिक वितरणाने होईल. यासह जैन सेवा संघाच्यावतीनेही या मंदिरात सामूहिक जिनस्तवन आयोजित केले आहे. संघाच्या पर्युषणपर्वाची सांगता रविवारी सकाळी आठ वाजता गंगावेश येथे श्री पार्श्वनाथ मानस्तंभ जैन मंदिरात होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Today will be held in the Rathotsav-Bahubali on the occasion of Purushottam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.